वेबसिरीजसाठी अक्षयने घेतले 90 कोटी मानधन!


MK Digital Line
बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आता डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वेबसीरिजसाठी त्याने सर्वाधिक म्हणजे 90 कोटी रुपये मानधन आकारल्याची चर्चा आहे.

आजवर वेबसीरिजसाठी इतके मोठे मानधन कोणत्याही कलाकाराला मिळालेले नाही.

'द एंड' असे या वेबसीरिजचे नाव असून याच वर्षी तिच्या शूटिंगला अक्षय सुरुवात करणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग पुढे ढकलले आहे.

या वेबसीरिजचे तीन सीजन असणार आहेत. त्यातील पहिला सीजन 8 भागांचा असणार आहे.

आगामी काळात अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याशिवाय त्याचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट थिएटर सुरू झाल्यावर प्रदर्शित होईल.

Post a Comment

Previous Post Next Post