व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन 'रुम' फिचर लवकरच लाँच


MK Digital Line
व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार 'रूम' फिचर लाँच करणार आहे.

रुम फिचरच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास 50 व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेब युझर्स व्हिडीओ कॉल करु शकणार आहेत. 

सध्या व्हॉट्सअ‍ॅप यावर काम करत असून लवकरच रूम फिचरसह पुढील काळात व्हॉट्सअ‍ॅप अनेक फिचर लाँच करणार आहे.

● मल्टि डिव्हाईस फिचर :

या फिचरच्या माध्यमातून युझर्स एक अकाऊंट चार वेगवेगळ्या मोबाईलमधून चालवू शकता. 

डाटा सिंक करण्यासाठी वाय-फायचा वापर करावा लागणार आहे. या फिचरचा खुलासा वेब बीटा इंफोने केला.

● एक्सपायरिंग मेसेज फिचर :

या फिचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.20.197.4 वर स्पॉट केले आहे. 

युझर्स या फिचरच्या माध्यमातून सात दिवसानंतर सेंड केलेले मेसेज ऑटो डिलिट करु शकतात.

● व्हिडीओ कॉल बटन :

या बटनच्या माध्यमातून युझर्स सहज ग्रुपमध्ये व्हिडीओ कॉल करु शकणार आहे. सध्या कंपनीकडून या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. 

दरम्यान, पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post