गुगल सर्चमध्ये आता दिसणार व्हिजिटिंग कार्ड
MK Digital Line
गुगल कंपनीने आपल्या ग्राहकांना आता एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता Google People Cards. याद्वारे युझर्सचे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड ऑनलाईन दिसणार आहे.
भारतात ही सेवा आता सुरू झालेली आहे. गुगल सर्चचे प्रोडक्ट मॅनेजर लॉरेन क्लार्क यांनी ही माहिती दिली आहे. यापुढे प्रत्येक यूजर्स गूगल सर्च इंजिन यावर वर्चुअल विजिटिंग कार्ड तयार करू शकेल.
आपली वेबसाईट किंवा सोशल मिडिया वेबसाईट यावर युझर्स हे टाकू शकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने आपली ओळख प्रस्थापित करण्याची संधी सर्वांसाठी गुगलने खुली केली आहे.
Post a Comment