अमेरिकेचा चीनला झटका; अमेरिकेची २४ कंपन्यांवर बंदी
MK Digital Line
दक्षिण चीन महासागर, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर समोरासमोर असणार्या दोन्ही देश आता व्यापार युद्धाकडे झुकलेले दिसत आहेत.
● चौकशी :
चिनी सैन्याची मदत करणार्या 24 कंपन्यांवर अमेरिकेनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या कंपन्या अमेरिकेत व्यापार करू शकणार नाहीत. कंपन्यांशी निगडित लोकांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
● आरोप :
दक्षिण चीन महासागरात कृत्रिम बेट तयार करून सैन्य तळ उभारण्यास चीनला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
● टीका :
यापूर्वीही दक्षिण चीन महासागरातील चीनच्या सुरू असलेल्या कुरघोडीवरून अनेकदा टीकाही झाली होती. शिवाय मेरीटाइम अफेयर्स ट्रिब्युनलनेही चीनविरोधात निकाल दिला होता.
● दावा :
सुबी रीफ हा स्पार्टल बेटांचा भाग आहे आणि यावर चीनचे नियंत्रण आहे. मात्र व्हिएतनाम फिलिपिन्स आणि तैवानदेखील यावर दावा करतात.
चीनने आतापर्यंत दक्षिण चीन महासागरात अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, युद्धनौका आणि फायटर जेट तैनात केली आहेत.
● हल्ला :
एका अज्ञात फायटर जेटचा चिनी फायटर जेट कसा पाठलाग करत आहे आणि या ठिकाणाहून निघून न गेल्यास त्यावर हल्ला केला जाईल, असे सांगत असल्याचा एक व्हिडीओ पीपल्स डेलीने जारी केला होता.
Post a Comment