'Microsoft Surface Duo' लवकरच होणार लाँच
MK Digital Line
मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्युओ हा स्मार्टफोन 10 सप्टेंबरला लाँच होणार आहे.
मायक्रोसॉफ्टच्या या ड्युअल स्क्रीन फोनची सुरुवातीची किंमत 1399 डॉलर्स म्हणजेच जवळपास 1.04 लाख रुपये असणार आहे.
● फीचर्स :
- प्राप्त माहितीनुसार, सर्फेस ड्युओमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 64 जीबी/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळू शकते.
- या फोनमध्ये 11 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा असेल. म्हणजे रिअर आणि फ्रंटसाठी एकच कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
- या फोनमध्ये 5.6 इंच एमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझॉल्यूशन1800×1350 पिक्सल असेल.
- डिस्प्लेची पिक्सल डेंसिटी 401पीपीआई असेल. फोनच्या डिस्प्लेला कोणत्याही अँगलन फिरवता येईल.
- फोनमध्ये अँड्रॉईड 10 मिळेल. सोबतच 3460mAh बॅटरी आणि 4जी एलटीई सपोर्ट सोबत हा फोन लाँच केला जावू शकतो.
दरम्यान, फोनच्या किंमतीची माहिती मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगमध्ये दिली असून लाँचिंगबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Post a Comment