'केजीएफ 2' मधील संजूबाबाचा लूक...कॉपीपेस्ट


MK Digital Line
केजीएफच्या तुफान यशानंतर या चित्रपटाचा सिक्वेल 'केजीएफ 2' लवकरच रिलीज होणार आहे. 

या चित्रपटात अभिनेता संजय दत्त हा अधीरा नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

संजूबाबाच्या वाढदिवशी त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला होता. अनेकांनी त्याच्या या लूकचे कौतुकदेखील केले होते. 

मात्र त्याचा हा लूक चोरीचा असून त्याची तुलना वायकिंग्स या सिरीजच्या पोस्टरसोबत केली जात आहे. 

डाएट सब्या या इंस्टाग्राम पेजने आपल्या अकाऊंटकरून हा प्रकार उघडकीस आणला आहे. 

या सिरीजमधील रग्नार लोथब्रुक या कॅरेक्टरच्या लूकशी साधर्म्य साधणारा संजय दत्तचा लूक आहे. 

त्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही पोस्टर व्हायरल होत असून अनेकांनी कॉपी पेस्ट अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post