रोहित शर्मासह 'या' पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार जाहीर
MK Digital Line
क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी याची अधिकृत घोषणा केली. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ आहे.
यापूर्वी 2016 मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.
खेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (2000) व सरदारसिंग (2017) यांना हा गौरव प्राप्त झाला होता.
रोहित शर्मा हा मानाचा पुरस्कार मिळवणारा चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Post a Comment