गुगलचे हे लोकप्रिय अॅप 'Google Play Music' होणार बंद
MK Digital Line
गुगल लवकरच आपले हे म्यूझिक अॅप बंद करणार आहे. गुगलने या संदर्भात माहिती आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.
गुगल प्ले म्यूझिक अॅपच्या सर्व युजर्सला यानंतर युट्यूब म्यूझिकवर शिफ्ट केले जाईल. मागील काही महिन्यांपासून गुगल युट्यूब म्यूझिक अॅपसाठी नवनवीन फीचर जारी करत आहे.
युट्यूब म्यूझिक अॅपवर शिफ्ट झाल्यानंतर युजर्सला गुगल प्ले म्यूझिक अॅपची प्लेलिस्ट, लायब्रेरी आणि म्यूझिक मिळेल. गुगल प्ले- म्यूझिकला ऑक्टोंबर 2020 नंतर कोणतेही अपडेट मिळणार नाही. तर डिसेंबर 2020 पर्यंत युजर्सला युट्यूब म्यूझिक अॅपवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया पुर्ण होईल.
सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे युजर्स या अॅपचा वापर करू शकणार नाहीत. तर ऑक्टोंबरपासून जगभरात हे अॅप बंद होईल. गुगल युट्यूब म्यूझिकवर नवनवीन फीचर देऊन युजर्सला आकर्षित करत आहे.
Post a Comment