भारतात कोरोना लसीच्या मानवी चाचणीस मंजुरी


MK Digital Line
भारतीय औषध महानियंत्रण ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या कोरोनावरील लसीची देशभर चर्चा सुरु आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मानवी चाचणीस सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला मंजुरी दिली आहे.

● मंजुरी :

कोरोना संदर्भातील विषेतज्ञ समितीने चर्चा केल्यानंतर औषध महानियंत्रक डॉ. वी.जी. सोमानी यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला रविवारी रात्री उशीरा ही मंजुरी दिली.

● मुल्यांकन :

कंपनीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलआधी सुरक्षे संदर्भातील माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संगठनजवळ जमा करावी लागणार आहे. याचे मुल्यांकन माहिती सुरक्षा निरीक्षण बोर्ड करणार आहे.

● परिक्षण :

ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे परिक्षण ब्रिटनमध्ये सुरु आहे. तिसऱ्या टप्प्याचे परीक्षण ब्राझीलमध्ये आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण दक्षिण आफ्रीकेत सुरु आहे.

● कोरोनामुक्त :

देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक ५१ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे.

Post a Comment

Previous Post Next Post