'मसल बार्बी' चे व्हिडिओ होत आहेत व्हायरल!
MK Digital Line
सध्या सोशल मीडियावर एका 24 वर्षीय बॉडी बिल्डर (मसल बार्बी) तरुणीचे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
रशियाची बॉडी बिल्डर असलेल्या या तरुणीचे नाव ज्युलिया व्हिन्स (Julia Vins) असे आहे. ज्युलिया इन्स्टाग्रामवर तिच्या वर्क आऊटचे व्हिडीओ नेहमीच अपलोड करत असते. तिचे जवळ-जवळ 10 लाख फॉलोअर आहेत.
ज्युलियाचे व्हिडीओ पाहून अनेक लोकं प्रभावित झाले आहेत. तिने वयाच्या 8व्या वर्षापासून पावर लिफ्टिंग करण्यास सुरुवात केली.
24व्या वर्षी डेडलिफ्टवर 175 किलोग्रामचे वजन उचलणाऱ्या फार क्वचित मुलींपैकी ज्युलिया एक आहे. तिच्या नावावर स्क्वाड आणि बेंच प्रेसमध्ये वर्ल्ड रेकॉर्डही असून सोशल मीडियावर ज्युलिया मसल बार्बी या नावाने प्रसिद्ध आहे.
मात्र सध्या लॉकडाऊनमुळे घरात कैद असणाऱ्या ज्युलियाने स्वत:साठी घरातच एक जिमही तयार करून घेतली आहे.
● व्हिडीओ पहा : https://bit.ly/38vY23e
Post a Comment