'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर लागली आग


MK Digital Line
एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म निर्मित लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य'च्या सेटवर आग लागल्याची घटना घडली आहे.

● अग्निशमन दल :

चित्रीकरण सुरु असताना शॉक सर्किट झाल्याने ही आग लागली. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

● परवानगी :

कोरोना संकटामुळे मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण थांबवले होते, मात्र त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि विविध अटींची पुर्तता करून चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली. 

● चित्रीकरण :

कुमकुम भाग्य मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच सेटवर आग लागली. या आगीमुळे चित्रीकरण त्वरीत थांबवण्यात आले.

● फटका :

एकता कपूर निर्मित 'कुमकुम भाग्य' मालिका सर्वात लोकप्रिय मालिका आहे. यात सृती झा आणि शब्बीर अहलूवालिया यांची मुख्य भूमिका आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मालिकांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post