संयुक्त राष्ट्राची महासभा ऑनलाईन होणार
MK Digital Line
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेवर देखील कोरोनाच्या संकटाचा परिणाम होणार आहे.
या वर्षी जगभरातील नेते या महासभेला स्वतः उपस्थित न राहता, आपल्या भाषणांचे व्हिडीओ पाठवणार आहेत. संयुक्त राष्ट्राकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
या वर्षी संयुक्त राष्ट्र आपले 75 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे.
मात्र अनेक देशात हवाई वाहतूक बंद असल्याने मोठ्या संख्येने अधिकारी येणे शक्य नाही. त्यामुळे अनेक नेत्यांनी कोरोना संकटामुळे संयुक्त राष्ट्रात येण्यास नकार दिला आहे.
जगातील सर्वात मोठ्या संस्थेच्या महासभेकडे दरवर्षी सर्वांचे लक्ष असते. यात 193 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात.
मात्र यंदा परिस्थिती वेगळी असल्याने, प्रतिनिधी व्हिडीओ संदेश पाठवणार आहेत.
Post a Comment