भारतामध्ये 'वनप्लस नॉर्ड' झाला लॉन्च
MK Digital Line
वनप्लसने आपला बहुप्रतीक्षित सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'वनप्लस नॉर्ड' लॉन्च केला आहे.
या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
● असे आहेत फिचर :
- हा फोन सुमारे 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजसह येतो.
- हा फोन ऑक्सिजन ओएस 10.5 वर आधारित Android 10 वर चालतो.
- यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे.
- या स्मार्टफोनला 5 जी सपोर्ट आहे.
- हा फोन Onyx Grey आणि Marble Blue अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
- या फोनमध्ये 48 एमपी क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. (8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स, 5 एमपी डीपथ सेन्सर आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स)
- या फोनमध्ये 4115mAh बॅटरी व Warp Charge 30T चार्जर आहे.
● जियो ग्राहकांसाठी ऑफर :
लॉन्च ऑफरचा एक भाग या फोनवर जिओ ग्राहकांसाठी 6000 रुपयांपर्यंतची सवलत आणि अमेरिकन एक्स्प्रेस कार्डवर 2000 रुपयांची ऑफरसह उपलब्ध असेल. ग्राहक सर्व प्रमुख बँकांमध्ये 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील घेऊ शकतात.
हा स्मार्टफोन 4 ऑगस्टपासून Amazon, OnePlus.in आणि वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Post a Comment