भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्कारने सन्मान
MK Digital Line
सिंगापूरमध्ये कोरोना संकट काळात कोरोना यौद्धा म्हणून अग्रस्थानी काम करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या नर्सचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
● पुरस्कार :
कला नारायणसामी यांचा 5 नर्सेसमध्ये समावेश आहे, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व नर्सेसना सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांच्याद्वारे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, एक ट्रॉफी आणि 10 हजार सिंगापूर डॉलर्स देण्यात आले.
● उपसंचालक :
नारायणसामी या वुडलँड्स हेल्थ कँम्पसमध्ये नर्सिंगच्या उपसंचालक आहेत. कोरोना महामारीच्या संकटात संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित केले आहे. या उपाययोजना त्यांनी 2003 साली सार्सच्या वेळी शिकल्या होत्या.
नारायणसामी या सध्या 2022 मध्ये सुरू होणाऱ्या वुडलँड हेल्थ कॅम्पसच्या नियोजनात सहभागी आहेत.
● नारायणसामी म्हणाल्या :
मी पुढील पिढीतील नर्सेसला तयार करेल. मी नेहमीच आमच्या नर्सेसना सांगते की, नर्सिंग तुम्हाला कधीच पुरस्कृत करण्यात अपयशी ठरणार नाही.
Post a Comment