अबब! देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 'एवढी'


MK Digital Line
जगभरासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 3 हजार 832 इतकी झाली आहे.

तर देशभरात आत्तापर्यंत कोरोना विषाणूने 25 हजार 600 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी घेतला असून 6 लाख 35 हजार 700 पेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तसेच देशभरात 3 लाख 42 हजार 473 कोरोनाबाधितांवर रुग्णांलयात उपचार सुरु असून अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चोवीस तास अविरत कार्यरत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post