टिकटॉकला नवा पर्याय! भारतात इंस्टाग्राम Reels उपलब्ध


MK Digital Line
आता इंस्टाग्रामने Reels (रील्स) नावाचे फीचर भारतात उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे टिकटॉकप्रमाणेच 15 सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ तयार करून पोस्ट करता येतात!

टिकटॉक बॅन झाल्यावर अनेक भारतीय पर्याय सध्या लोकप्रिय होत आहेत. अशावेळी इंस्टाग्राममध्ये हे फिचर येत असल्याने अनेकांचा ओढा तिकडे वळण्याची जास्त शक्यता आहे.

अगोदर रील्स ब्राजील, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये उपलब्ध होतं. हे टिकटॉकप्रमाणे स्वतंत्र ॲप नसून इंस्टाग्राममध्येच जोडण्यात आलेलं फीचर आहे.

● असे वापरा Instagram Reels : 

  • सर्वप्रथम तुमचे इंस्टाग्राम ॲप अपडेट करून घ्या. 
  • आधीच्या बूमरँग आणि सुपरझुमच्या सोबत स्टोरीज विभागात आता नवा Reels चा पर्याय आलेला दिसेल. 
  • याद्वारे 15 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून स्टोरीजमध्ये शेयर करू शकाल. Explore टॅबमध्येही शेयर करता येईल.
  • यात देखील एडिटिंगसाठी काही टूल्स असून एडिट करून त्याला उपलब्ध गाणी जोडून पोस्ट करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post