गुगलचा मोठा निर्णय! (Work From Home)


MK Digital Line
गुगलने आपल्या कर्मचार्‍यांचा घरून काम करण्याचा (Work From Home) अवधी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत वाढवला आहे. 

कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुगलचे कर्मचारी जुलै 2021 पर्यंत घरातून काम करू शकतात.

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचार्‍यांना ईमेल पाठविला आहे. 

● ई-मेलमध्ये लिहिले आहे :

'कर्मचार्‍यांना पुढील नियोजन करण्यासाठी आम्ही घरातून काम करण्याचा पर्याय जुलै 2021 पर्यंत वाढवत आहोत. हे अशा कर्मचाऱ्यांसाठी असेल ज्यांना कार्यालयातून काम करण्याची आवश्यकता नाही.' 

वृत्तानुसार सुंदर पिचाई यांनी काही महत्त्वाच्या गुगलच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर स्वत: हा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post