चीनमधून कलर TV आयात करण्यास बंदी


MK Digital Line
मोदी सरकारनं चीनकडून येणारी आयात रोखण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला त्यानंतर आणखी एक पाऊल उचलण्यात आल्यानं चीनला मोठा झटका बसला आहे.

चीनमधून भारतात येणाऱ्या कलर टीव्हीच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली. 

चीनच्यासारख्या देशातून टीव्ही खरेदी करून उत्पादनाला चालना देणे कमी करण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला आहे. 

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं हे निर्बंध 36 सेमी ते 105 सेमी आकाराच्या टीव्ही स्क्रीनसाठी घातले आहेत. 

हा निर्बंध 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टीव्ही सेटवर देखील लागू करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post