अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण


MK Digital Line
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना झाला आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 

दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्याला आणि त्याच्या पत्नीला कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि दाऊद आणि त्याची पत्नी यांना मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post