ट्विटरचे फ्लिट फिचर उपलब्ध


MK Digital Line
ट्विटरचे फ्लिट हे फिचर आता भारतीय युजर्सला देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

● फ्लिट फिचर काय आहे? :

फेसबुकच्या स्टोरीप्रमाणे 24 तासांनी आपोआप गायब होणार्‍या अपडेटची सुविधा देणारे हे फिचर आहे.

सुरुवातीला मोजक्या देशांमधील युजर्ससाठी हे लाँच करण्यात आले होते. आता ही सुविधा भारतीय युजर्सलाही उपलब्ध करण्यात देण्यात आली आहेहे. फ्लिटस् हे ट्विटच असणार आहे. तथापि, याला रिट्विट, लाईक अथवा रिप्लाय आदी करता येणार नाहीत. 

तर याला थेट डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून दुसरा युजर रिअ‍ॅक्ट करू शकेल. फ्लिट हे ट्विट युजरच्या टाईमलाईनमध्ये दिसणार नसून याला युजरच्या अवतारवर क्लिक करून पाहता येणार आहे.

हे ट्विट बरोबर 24 तासांनी आपोआप नष्ट होणार असून यात युजर पोस्ट, इमेज अथवा व्हिडीओ अपडेट करू शकणार आहे. भारतातील युजर्सला येत्या काही दिवसांमध्ये क्रमाक्रमाने याचे अपडेट मिळणार असल्याची माहिती बेकपोर यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post