अंडरटेकरची WWE मधून निवृत्ती


MK Digital Line
जवळपास 33 वर्ष WWE च्या रिंगमध्ये राज्य करणाऱ्या अंडरटेकरने अखेर प्रोफेशनल रेसलिंगमधून निवृत्ती घेतली आहे. 

WWE च्या डॉक्यूमेंट्री सीरिजमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. अंडरटेकरने लास्ट राइड या सीरिजमध्ये स्पष्ट केले की आता रेसलिंग न केल्यामुळे शांती मिळत आहे. मागील काही वर्षात निवृत्तीनंतर देखील हे जमत नव्हते.

● अंडरटेकरने केले स्पष्ट :

सध्या तरी रिंगमध्ये परतण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. मी पुन्हा येऊ शकतो का? हे तर वेळच सांगेल. गरज पडल्यास मी पुन्हा येण्याचा देखील विचार करेल, असेही अंडरटेकरने स्पष्ट केले.

1990 च्या दशकात अंडरटेकरने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच मनावर त्याने राज्य केले. भारतात देखील त्याचे मोठे चाहते आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post