राजधानी दिल्ल्लीवर दहशतवादाचे संकट


MK Digital Line
राष्ट्रीय राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. 

दिल्लीत पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यानंतर दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. 

दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने चार ते पाच दहशतवादी हे दिल्लीत घुसण्याची शक्यता असून असून पोलिसांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे.

● सर्व 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी :

राजधानीच्या सर्व 15 जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त क्राईम ब्रांच आणि विशेष कक्ष लाही सतर्क करण्यात आले आहे. 

दिल्ली पोलिस सातत्याने पाळत ठेवत असून त्याचबरोबर सीमेवरील लोक आणि वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर आता विशेष दक्षता घेतली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post