धक्कादायक! लग्नाच्या 9 वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे!
MK Digital Line
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये एक अशी घटना घडली आहे. ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
लग्नाच्या 9 वर्षांनंतर पतीला समजले कि, आपली पत्नी स्त्री नसून पुरुष आहे. या घटनेने पतीला जबर मानसिक धक्का बसला आहे.
● खुलासा कसा झाला? :
महिलेला दुखू लागल्याने हॉस्पिटलला नेले असता करण्यात आलेल्या तपासणीत तीस्त्री नसून पुरुष असल्याचे तपासणीमध्ये समोर आले.
तपासणीत महिलेच्या अंडकोशाला कॅन्सरचे निदान झाले. कोलकाताच्या नेताजी सुभाष चंद्र बोस हॉस्पिटलमधील . डॉ. अनुपम दत्ता आणि डॉ. सौमन दास यांनी केलेल्या तपासणीनंतर महिलेचे खरे रुप समोर आले. या घटनेनंतर डॉक्टरांसह तिचा पतीही शॉक झाला. सध्या डॉक्टरांनी त्याचे काऊन्सेलिंगही सुरु केले आहे.
● सोनोग्राफीमुळे समजले :
डॉक्टरांना सोनोग्राफी करताना गर्भाशय नसल्याची शंका आली. यामुळे त्यांनी महिलेची कॅरिओटायपिंग टेस्ट (क्रोमोझोम्सचा अभ्यास) केली. यात महिलेचे पुरुषासारखे XY क्रोमोझोम्स असल्याचे दिसले.
● डॉक्टरांनी सांगितले :
- ती दिसायला महिलाच असून आवाज, महिलेचे शरीर आदी काही स्त्री सारखेच आहे.
- मात्र, तिच्या शरिरामध्ये जन्मापासून गर्भाशय आणि अंडाशय नाही. तिला कधी मासिक पाळीही आलेली नाही.
- हा प्रकार दुर्मिळ असून 22000 लोकांमागे एक असा व्यक्ती आढळतो.
- विशेष म्हणजे तिच्या 28 वर्षीय बहिणीलाही या महिलेसारखीच समस्या असल्याचे दिसले.
- शरिरातून ते पुरुष असतात पण बाह्य शरीर स्त्रीचे असते.
- महिलेला कॅन्सर असल्याने तिच्यावर किमोथेरपी केली जात आहे.
भुतकाळात महिलेच्या दोन नातेवाईकांनाही अशीच समस्या असल्याचे समोर आले होते. यामुळे दोघांचीही समजूत काढण्याचा नातेवाईक प्रयत्न करत आहेत.
Post a Comment