चिनी कंपनीला दिलेले 500 कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार


MK Digital Line
भारत-चीन मधील वाढत्या तणावाचे परिणाम सीमेवर व तसेच बाजारपेठेवर पडलेले दिसत आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याचे काम सरकारने सुरु केलेलं आहे. 

● 'तो' करार रद्द : 

देशाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये रेल्वेची कामं ज्या चीन रेल्वे सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कॉर्पोरेशनला (सीआरएससी) देण्यात आली आहेत. त्यासंबंधितील करार रद्द करण्याची सहमती देण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सीआरएससी ही एकमेव चिनी कंपनी होती. चीनच्या हेकेखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार काही महत्वाच्या योजना आखत आहे. 

त्यानुसारच भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटे चिनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही सरकारी कंपन्यांनाही चीनी समान वापरू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. 

यात सरकारच्या मालकीच्या बीएसएनएल लाही नवीन प्रणाली बसवताना चिनी सामान न वापरण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post