गरीब कल्याण रोजगार अभियान : पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
MK Digital Line
कोरोना आणि लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारने नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारतर्फे गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी मोदी यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
● पंतप्रधान मोदी म्हणाले :
“अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थांशी संवाद साधल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचे काम केले. घरी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे सुरू केली.
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग हादरले, मात्र भारतीय खंबीरपणे उभे राहिले. ग्रामीण भारताने कोरोनाचे संक्रमण प्रभावीपणे रोखले आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे.
● नमन :
आपण जे केले तितके काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झाले असते, तर प्रचंड कौतुक झाले असते. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणाऱ्यांना मी नमन करतो,” असेही मोदी म्हणाले.
● आवाहन :
लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी देत होते. मात्र, ते आता गावांसाठी करावे,” असे आवाहन मोदी यांनी केले.
Post a Comment