चीनी हॅकर्सकडून 40 हजारांहून जास्त सायबर हल्ले


MK Digital Line
महाराष्ट्र सायबर सेलने चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असे सांगत गेल्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात चीनमधून 40 हजारांहून जास्त वेळेस सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मंगळवारी दिल्याने नागरिकांना महाराष्ट्र सायबर सेलने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

● सायबर हल्ल्याचे प्रयत्न :

इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना गेल्या चार-पाच दिवसांमध्ये सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. किमान 40,300 अशाप्रकारचे सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. 

सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न चीनच्या चेंगदू भागातून झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली.

● आवाहन :

सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे. तुम्हाला आकर्षित करणारा / आर्थिक प्रलोभन देणारा विषय असलेला इमेल किवा मेसेज चिनी हॅकर्स पाठवू शकतात.

covid2019@gov.in किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये.

सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापर करा, अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलने दिली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post