जपानचा जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर
MK Digital Line
जपानने अमेरिका आणि चीनला मागे टाकत जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर तयार केला आहे.
या कॉम्प्युटरचे नाव फुगाकू आहे. यात 48 कोर ए 64 एफएक्स चीप लावलेली आहे. विशेष म्हणजे हा जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर आहे, ज्यात एआरएम प्रोसेसरचा वापर केला आहे.
● सुपर कॉम्प्युटर :
फुगाकूने 415.5 पेटाफ्लॉप्सचा परिणाम दिला आहे. जो आयबीएमच्या समिट सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत 2.8 पट अधिक आहे. आयबीएम समिट जगातील दुसरा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे.● बाजी :
फुगाकूने अनेक चाचण्यांमध्ये टॉप रँकिंग मिळवली आहे. सर्वसाधारणपणे सुपर कॉम्प्युटरमध्ये अमेरिका आणि चीनचा दबदबा असतो. मात्र यंदा जपानने बाजी मारली आहे.मागील 9 वर्षात फुगाकू जपानचा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे, ज्याने टॉप-500 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत 226 चायनीज सुपर कॉम्प्युटर, 114 अमेरिकन आणि 30 जपानचे सुपर कॉम्प्युटर्स आहेत.
Post a Comment