Website बनवताय? मग तुमच्यासाठी उपयुक्त टिप्स!
MK Digital Line
डिजिटल जमान्यात व्यवसाय अथवा संस्थेसाठी संकेतस्थळ बनवले गरजेचे बनले आहे. मात्र हे बनवताना खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला फायदा होईल.
- आपल्याला संकेतस्थळ का बनवायचे आहे? त्याबाबत आपला हेतू स्पष्ट असावा.
- आपल्या व्यवसायाला साजेसे डोमेन/ संकेतस्थळाचे नाव असेल याबाबत आग्रही रहा.
- 'वेब होस्टिंग' निवड करताना योग ती काळजी घ्या, घाई करू नका!
- जर आपण स्वतः संकेतस्थळ विकसित करणार असाल, तर योग्य तंत्रज्ञानाची निवड करण्यासाठी अनुभवी मार्गदर्शन घ्या.
- आवश्यकतेनुसार कच्चा आराखडा तयार करा. योग्य रंगसंगती, अक्षरशैली, मांडणी यांची निवड करा.
- नेव्हीगेशन मेन्यू, फूटर, साईडबार, स्लाइड-इन्स्, पॉप-अप्स्, सोशल मिडिया इंटिग्रेशन इत्यादी गोष्टींचा खुबीने समावेश करा.
- संकेतस्थळ वेगवान व भ्रमणध्वनीसाठी अनुकूल बनवणे महत्वाचे आहे.
- उत्तम प्रतिच्या प्रतिमा, ध्वनीचित्रफित व लोगो/ व्यापारी चिन्हाचा वापर करा.
- आपल्या वस्तू, सेवा अथवा संपर्कासंबधित माहिती सहजरित्या उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा.
- स्वतःला ग्राहकांच्या जागी ठेवून विचार करा, की आपले संकेतस्थळ खरोखरच उपयुक्त ठरेल का?
Post a Comment