फोटो खरा की, खोटा आता गुगलच सांगणार...

MK Digital Line
युझर्सपर्यंत आलेला फोटो हा खरा आहे की, खोटा हे आता गुगलच सांगणार असून गुगलने आपल्या सर्चमध्ये बदल केला आहे. आता गुगल सर्च केल्यानंतर इमेज थम्बनेलच्या खालीच फॅक्टचेकचे लेबल दिसणार आहे.

युझर्स जेव्हा या गुगल सर्चच्या रिझल्टवर टॅप करुन मोठ्या आकारामध्ये इमेज पाहतील. तेव्हा त्यांना इमेजच्या फॅक्ट चेकसंदर्भातील माहिती वेब पेजवर दिले, असे गुगल ग्रुप प्रोडक्टचे व्यवस्थापक हॅरीस कोहेन यांनी म्हटले आहे.

फोटोंच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी गुगलने आपल्या सर्च आणि न्यूज पर्यायांमध्ये हे नवे फिचर आणले आहे. स्वतंत्र, अधिकृत माहिती स्त्रोतांकडून आलेल्या आणि गुगलच्या नियमांमध्ये बसणाऱ्या वेब पेजेसवरील फोटोंवर हे लेबल दिसणार आहे.

फोटोंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ऑनलाइन प्रकाशक वापरतात त्या ‘क्लेमरिव्ह्यू’चा वापर करण्यात येणार आहे. ही माहिती युझर्सला सहज सापडावी म्हणून गुगलने आधीपासूनच फॅक्ट चेकची माहिती सर्चवर तसेच गुगल न्यूजमध्ये देण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post