गुगलने प्रायव्हसी सेटिंगमध्ये केले नवीन बदल


MK Digital Line
गुगल कंपनीने आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही नवीन बदल केले आहेत. त्यानुसार गुगलने असे फिचर आणले आहे ज्यामध्ये ऑटोमॅटिक गुगलचा डेटा डिलीट होणार आहे.

नवीन सेटिंग अंतर्गत आता गुगल 18 महिन्यांनंतर आपले लोकेशन, हिस्ट्री आणि व्हॉईस कमांडचा डेटा ऑटो डिलीट करणार आहे.

याआधी हे फिचर फोनमध्ये उपलब्ध होतंच परंतु ते आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन सुरू करावे लागत होते.

युझर्ससाठी हा पर्याय ठेवण्यात आला होता. आता अपडेटेड सेटिंगमध्ये मात्र हा पर्याय नसेल. यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने 18 महिन्यांनंतर डेटा डिलीट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post