'ते' फोटो तत्काळ डिलीट करा; सायबर सेलचा इशारा


MK Digital Line
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. रविवारी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

● इशारा :

सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सोशल मिडियावर सुशांतच्या घरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने याच फोटोंवरुन इशारा दिला आहे.

● आवाहन :

सुशांतचे ते फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याचबरोबर यापूर्वी अनेकांनी हे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे. ज्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंविषयी इशारा पोलिसांनी दिला आहे. 

न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा प्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जाऊ शकते. महाराष्ट्र सायबरने सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट न करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post