एकट्या मुंबईत १८७१ पोलिसांना कोरोना
MK Digital Line
मुंबईत आत्तापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर २१ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या ८२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ५७१ जण असून २३१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर होम आयसोलेशनमध्ये ३१ जणांना ठेवण्यात आले आहे.
तर १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६३४ जण बरे झाले आहेत, मात्र त्यांनी अजून ड्युटी जॉईन केलेली नाही.
कोरोनामुक्त झालेले आणि ड्युटी जॉईन केली असे २१९ जण आहेत. तर २१ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला असून सदरील माहिती ८ जूनपर्यंत आलेल्या अहवालातून देण्यात आली आहे.
Post a Comment