'अॅमेझॉन' देणार 20 हजार लोकांना रोजगार...!
MK Digital Line
कोरोनामुळे भारतात आलेल्या बेरोजगारीच्या संकटात अॅमेझॉन इंडिया कंपनी मदतीचा हात देणार आहे.
कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या नियुक्त्या ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे.
● कंपनीचा अंदाज काय? :
- पुढिल 6 महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे.
- देशभरातील हैदराबाद, पुणे, कोईम्बटूर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदिगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये नव्या कामगारांना रोजगार देणार आहे.
● काम आणि पात्रता काय? :
- 20 हजार पदांपैकी अनेक पदे अॅमेझॉनच्या 'वर्चुअल ग्राहक सेवा' कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहे.
- यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे.
- या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास आहे.
- तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत.
Post a Comment