अभिनेत्री दीपिका 'याला' मानते भाऊ
MK Digital Line
बॉलीवूड सेलेब्रिटी संरक्षणासाठी सर्रास वैयक्तिक बॉडीगार्ड ठेवतात. सलमान खान, शाहरुख खान यांचे बॉडीगार्डदेखील सोशल मीडियावर सेलेब्रिटी झाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत देखील एक बॉडी गार्ड असतो आणि दीपिका सार्वजनिक कार्यक्रमात जाते तेव्हा तो अनेकदा पाहिले गेले आहे.
● राखी बांधते :
दीपिकाच्या बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. तो गेली अनेक वर्षे दीपिकासोबत आहे. दीपिकाचे आणि त्याचे नाते तयार झाले असून दीपिका प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते. म्हणजे तो तिच्या कुटुंबातील एक सदस्य बनला आहे.
● लग्नाला उपस्थित :
2018 मध्ये दीपिका रणवीरचे लग्न झाले तेव्हा दीपिकाचे अनेक नातेवाईक इटली येथील लेक कोमो येथे हजर राहू शकले नाही मात्र जलाल लेक कोमो येथे वधूपक्षाकडून उपस्थित होता.
दीपिका त्याच्या पगाराबद्दल कधीच काही बोलत नाही. मात्र काही वर्षांपूर्वी जलाल दीपिका वर्षाला 80 लाख रुपये पगार देते असे सांगितले जात होते. आता दीपिका जलालला वर्षाला किमान 1 कोटी पगार देत असावी असा अदांज आहे.
Post a Comment