'ती' बंदी परिणामकारक ठरली : लोकेश राहुल
MK Digital Line
2019 मधील बंदीचा माझ्यावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे मत भारताचा फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केले आहे.
लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्यावर एका टीव्हीवरील कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
● लोकेश राहुल म्हणाला :
2019 नंतर मीक्रिकेटचा विचार करण्याच्या प्रक्रियेत बदल केला आणि त्यामुळेच मी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.
संघासाठी चांगली कामगिरी करण्याचे ठरवल्यामुळे माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेत बदल झाला. माझ्यावरील दबावही थोडा कमी झाला.
आमची कारकीर्द फार मोठी नसते. आता माझ्याकडे खेळाडू म्हणून 10-11 वर्षेच शिल्लक आहेत. त्यामुळे खेळात सुधारणा करण्याची आणि संघासाठी खेळण्याची हीच वेळ आहे हे मला लक्षात आले.
Post a Comment