Xiaomi Redmi 10 X 26 मे ला होणार लाँच
MK Digital Line
शाओमीची सब ब्रांड रेडमी नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत असून 26 मे रोजी हा फोन रेडमी 10 एक्स नावाने लाँच केला जात आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन एमोलेड डिस्प्ले आणि 30 एक्स झूम सपोर्ट सह असेल.
चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वाईबो नुसार हा फोन ड्युअल सीम आहे आणि दोन्ही सीम कार्डवर युजरला 5 जी सुविधा मिळणार आहे.
फोटो अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी 30 एक्स झूमचा सपोर्ट दिला गेला असून क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
मेन कॅमेरा 48 एमपीच असून चीनच्या रिटेलर वेबसाईटवर त्याचे प्रीबुकिंग सुरु झाले आहे.
ब्ल्यू, गोल्ड, पर्पल आणि व्हाईट कलर मध्ये या फोनची 4G आणि 5G अशी दोन्ही व्हेरीयंट उपलब्ध असतील.
6 जीबी रॅम, 64 जीबी आणि 128 जीबी मेमरी तसेच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी अशी व्हेरीयंट असून त्यांची किंमत 15 ते 18 हजार रुपया दरम्यान आहे.
Post a Comment