शाओमीचा Mi 10 स्मार्टफोन भारतात होणार लाँच


MK Digital Line
शाओमी कंपनी आता हा स्मार्टफोन भारतात 8 मे रोजी लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. 

या फोनला भारतात मार्च महिन्यात लाँच करण्यात येणार होते. परंतु, भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती.

● Xiaomi Mi 10 ची किंमत :


▪️ कंपनीने 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 3999 चिनी युआन म्हणजेच 40 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

▪️ 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 4299 चिनी युआन म्हणजेच 43 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

▪️ 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 4699 चिनी युआन म्हणजेच 47 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. 


● Xiaomi Mi 10 ची वैशिष्ट्ये :


▪️ कंपनीने या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. 

▪️ या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड 10 वर आधारीत एमआयईयूआय 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 

▪️ कंपनीने या फोमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 13 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि 2-2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. 

▪️ तसेच या फोनमध्ये फ्रंटला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ड्युअल मोड 5 जी, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ यासारखी फीचर्स आहेत. 

▪️ या फोनमध्ये 4780 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ज्यात 30 वॅट वायर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post