इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम
MK Digital Line
फक्त 1 सेंकदामध्ये 1000 एचडी चित्रपट डाऊनलोड करणे भविष्यात शक्य होणार आहे. जगभरातील सर्व विक्रम तोडत ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांना जो इंटरनेट स्पीड मिळाला आहे, तो टेराबाइट प्रति सेंकद (टीबीपीएस) आहे.
● नवीन विश्वविक्रम :
हा इंटरनेट स्पीड एवढा वेगवान आहे की, यामुळे फक्त एका मिनिटात 42 हजार जीबीपेक्षा अधिक डेटा डाऊनलोड करता येईल. नवीन विश्वविक्रम 44.2 टीबीपीएसचा आहे. या स्पीडमध्ये युजर एका सेंकदात 1 हजारांपेक्षा अधिक चित्रपट डाऊनलोड करता येतील.
● टॉप स्पीड :
कॉम्प्युटरवर मिळणाऱ्या डेटा स्पीडमध्ये 1 मेगाबाइटमध्ये 10 लाख युनिट्स डिजिटल इंफॉर्मेशन असते. चांगल्या ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे 100 एमबीपीएस टॉप स्पीड मिळतो. म्हणजेच एका सेंकदात 100 एमबी डेटा रिसिव्ह होतो. मोबाईल डेटा किंवा व्हायरलेस कनेक्शनमध्ये हा स्पीड 1 एमबीपीएस पेक्षा कमी असतो.
● डाउनलोड :
जो स्पीड संशोधकांना मिळाला आहे, त्यात 1 टेराबाइटमध्ये 1000 अब्ज यूनिट डिजिटल इंफॉर्मेशन असते. टेराबाइट प्रति सेकंद इंटरनेट स्पीड मिळाल्यास, 1 सेंकदात 1000 जीबी डेटा डाउनलोड करणे शक्य आहे.
Post a Comment