जागतिक रेडक्रॉस दिन काय आहे?
MK Digital Line
मानवहितवादी, सेवाभावी व स्वयंसेवी संघटना 'रेडक्रॉस' एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याद्वारे कुठल्याही भेदभावाशिवाय लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे कार्य केले जाते.
'रेडक्रॉस' मोहिमेचे जन्मदाते जीन हेनरी ड्यूनेन्ट यांचा जन्मदिन (8 मे 1828) संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून देखील साजरे केले जाते.
● संघटनेचे कार्य काय? :
- हेनरी यांचा 1910 मध्ये (स्विर्त्झलँड) मृत्यू झाला. मात्र, त्यानंतरही त्यांचे कार्य थांबले नाही तर मोठ्या गतीने आजपर्यंत चालू आहे.
- सन 1919 पासून रेडक्रॉस मानवाचा त्रास कमी करण्याकडे विशेष लक्ष देत आहे.
- हेनरी यांनी सेवाकार्यासाठी या समितीला रेडक्रॉस असे नाव दिले.
- या समितीची ओळख पटण्यासाठी एका पांढऱ्या पट्टीवर लाल रंगाच्या क्रॉस चिन्हाला मान्य करण्यात आले. आता हे चिन्ह संपूर्ण विश्वाला मानवासाठी केलेली निःस्वार्थ सेवाभाव म्हणून ओळखले जाते.
- रेडक्रॉस या संघटनेचा मुळ उद्देश हा युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची आणि परिसरातील नागरिकांची देखभाल आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले.
- जागतिक पातळीसह महाराष्ट्रातही रेडक्रॉस ही संघटना कार्यरत आहे.
- आजच्या काळात जगातील सर्वात जास्त ब्लड बँक (रक्त पेढी) रेडक्रॉस आणि त्यांच्या सहयोगी संस्था राबवतात.
- या संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे हजारो लोकं थॅलेसेमिया, कर्करोग, आणि रक्ताल्पता (एनिमिया) सारख्या आजारापासून वाचत आहे.
- 1917 साली रेडक्रॉस संघटनेला नोबेल पारितोषिक दिले आहे.
Post a Comment