लॉकडाऊन 4.0 चा प्लॅन काय असू शकतो?


MK Digital Line
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान देशाला संबोधित करणार असल्याने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन कसा असेल? याविषयी अनेक तर्क लढविले जात आहे. 

दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनपेक्षा चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम वेगळे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्याच्या बैठकीत दिलेल्या संकेतनुसार एका प्लॅन माहिती समोर आली आहे. ती जाणून घेऊयात... 

● असे असणार बदल :


लॉकडाऊन 4 मध्ये संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची शक्यता आहे.

तसेच मजुरांच्या स्थलांतरणामुळे मजुरांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ज्या राज्यांत हे मजूर परततील त्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या राज्यांत अशी रुग्ण संख्या वाढेल, त्या ठिकाणी अधिक तयारीत राहण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post