भारताला 5G सेवेसाठी किमान 'एवढे' वर्षे प्रतीक्षा


MK Digital Line
रोनाचा प्रभाव भारतातील 5G सेवा सुरु करण्यावर पडणार असल्याचे स्पष्ट झाले असून भारतात ही सेवा सुरु होण्यासाठी किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल असे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने यंदा 5G रेडिओवेब शिवायच टेलिकॉम स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया सुरु केली असून या वर्षीचे लिलाव ऑक्टोबरपूर्वी होतील असे समजते.

चार कंपन्यांची निवड : लिलावासाठी व्यवस्थापन व सोफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीची अंतिम निवड 22 मे ला होणार आहे. त्यासाठी चार कंपन्यांची निवड झाली असून त्यातील दोन कंपन्यांना स्पेक्ट्रम विक्रीचा अनुभव आहे असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार : लिलाव प्रक्रीयेत 3300-3600 मेगाहर्ट्स बँडचा समावेश केलेला नाही. याच रेडिओ वेव्हचा वापर 5G साठी होतो. संरक्षण विभागाने 5G रेडिओसाठी 100 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमची मागणी केल्याने फक्त 175 मेगाहर्ट्स शिल्लक राहणार आहे.

लिलाव : त्यामुळे किमान दोन वर्षे 5G साठी प्रतीक्षा करावी लागेल असा अंदाज आहे. मूळ योजनेनुसार 8 हजार मेगा स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार असून त्यात 700, 800, 900, 1800, 2100, 2300, 2500 मेगा हर्ट्सचा समावेश आहे. याची एकूण किंमत 3 लाख कोटी असल्याचे समजते.

एअरटेल, व्होडा आणि आयडिया यांच्या अनेक परवान्यांचे नुतनीकरण लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याने हे लिलाव शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही समजते.

Post a Comment

Previous Post Next Post