ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V19 भारतात लॉन्च


MK Digital Line
Vivo कंपनीने भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V19 लॉन्च केला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन गेल्या महिन्यातच लॉन्च झाला आणि आता कंपनीने हा फोन भारतातही लॉन्च केला आहे. 

● 2 मॉडेल्स मध्ये उपलब्ध :

कंपनीने हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज अशा दोन मॉडेल्समध्ये आणलाय. 

● सेल :

15 मेपासून कंपनीच्या ई-स्टोअर, Amazon, Flipkart, अन्य ई-कॉमर्स वेबसाइट आणि पार्टनर ऑफलाइन स्टोअर्समध्ये विक्रीला सुरूवात होईल.

● कॅमेरा :

यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तर, अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत.

● सेल्फी :

फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा प्रायमरी सेल्फी कॅमेरा तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

● बॅटरी :

Vivo V19 मध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4,500 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. 

● किंमत :

8 जीबी रॅम + 128 जीबी : 27,990 | 8 जीबी रॅम + 256 जीबी : 31,990

Post a Comment

Previous Post Next Post