‘ऑस्कर’ कडून इरफानला आदरांजली


MK Digital Line
ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या संस्थेने अभिनेता इरफान खानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

● ‘ऑस्कर’ कडून इरफानला आदरांजली: 

'बॉलिवूड सिनेसृष्टीने एक मोठा अभिनेता गमावला. ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘द नेमसेक’ यांसारख्या चित्रपटांमधून इरफानने जागतिक स्थरावर आपल्या अभिनयाची छाप सोडली. 

लाखो लोकांसाठी तो प्रेरणा होता. आंम्हाला त्याची खूप आठवण येईल.' अशा आशयाचे ट्विट करुन अ‍ॅकेडमी संस्थेने इरफान खानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

● सिनेकरिअर :

30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. 

● पद्मश्री पुरस्कार :

कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन इरफान खानचा गौरव करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post