टिकटॉकला फटका; रेटिंग 1.3 वर!


MK Digital Line
गेल्या काही दिवसात सुरु असलेल्या टिकटॉकर्स Vs युट्यूबर्स या 'कोल्ड वॉर' मुळे टिकटॉक अ‍ॅपची रेटिंग स्टार झपाट्याने कमी होत 1.3 वर घसरली आहे. 

पहिल्यांदा टिकटॉक रेटिंगमध्ये ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर #BANTIKTOK असे हॅशटॅग देखील ट्रेंडिंगवर आहेत. 

● नेमके काय झाले? :

झाले असे कि, युट्यूबवर एकाने टिकटॉकवाल्यांसाठी ओरिजनल कंटेट काय असतो? यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ तयार केला. याला प्रत्युत्तर म्हणून टिकटॉक स्टार आमिर सिद्दिकी मैदानात उतरला. 

तो म्हणाला, युट्यूबर्स वाल्यानो तुम्ही तुमचे व्हिडिओ तयार करा आम्ही आमचे व्हिडिओ तयार करतो, कशाला वाद करायचा?. 

पुढे आमिरला उत्तर देण्यासाठी रोस्टिंग करणारा कॅरी मिनाती नावाचा युट्यूबर या मैदानात उतरला. त्यानंतर सोशल मीडियावर टिकटॉकर्स आणि युट्यूबर्समध्ये कोल्ड वॉर सुरू झाले. 

कॅरीच्या या व्हिडिओला विक्रम व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. मात्र हा व्हिडिओ युट्यूबने काढून टाकला. यानंतरच हळू-हळू टिकटॉकची रेटिंग झपाट्याने कमी होत असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post