'ही' कंपनी सुरु करणार कोरोनाची चाचण्या!


MK Digital Line
ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड या भारतीय औषध कंपनीला फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. फॅव्हीपीरावीर हे औषध कोरोना व्हायरसवरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे.

जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची 2014 मध्ये परवानगी देण्यात आली.

फॅव्हीपीरावीर हे औषध कोरोनाच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे. या औषधाचे साईड इफेक्टही होत नाहीत. मागच्या महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी सुद्धा फॅव्हीपीरावीर प्रभावी ठरत असल्याचे म्हटले होते.

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांवर फॅव्हीपीरावीर या औषधाच्या चाचण्या लवकरच सुरु करण्यात येतील अशी माहिती सुश्रुत कुलकर्णी यांनी दिली. ते ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सचे उपाध्यक्ष आहेत.

वुहान आणि शेनझेन येथे 340 रुग्णांवर या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या असे हँग शिनमीन या चीनच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने मागच्या महिन्यात सांगितले होते.

Post a Comment

Previous Post Next Post