बॉलिवूडच्या या कलाकारांनी सुद्धा कॅन्सरमुळे केलं जगाला अलविदा


MK Digital Line
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननं सर्वांचा निरोप घेतला. न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरनं तो मागच्या 2 वर्षांपासून आजारी होता. 

2018 मध्ये त्याला या कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरमुळे निधन झालेला इरफान खान हा पहिलाच अभिनेता नाही. 

कॅन्सरमुळे बॉलिवूडनं या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.


● विनोद खन्ना :
2017 मध्ये दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं होतं. विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर होता. ज्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात उपचार घेत होते.

● नर्गिस :
1981 मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता. ज्यामुळे त्या बराच काळ हॉस्पिटलमध्ये होत्या.

● राजेश खन्ना :
एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना सुद्धा कॅन्सरची लढाई हारले होते. बराच काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.

● फिरोज खान :
बॉलिवूड अभिनेता फिरोज खान यांचंही कॅन्सरमुळेच निधन झालं होतं. 2009 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.

● सिंपल कपाडिया :
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहीण सिंपल यांचही कॅन्सरमुळे निधन झालं होतं. 3 वर्ष कॅन्सरशी लढल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता.

Post a Comment

Previous Post Next Post