राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 हजार 974 वर पोहचली
MK Digital Line
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 झाली आहे. गुरुवारी 1216 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यात गुरुवारी 207 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3301 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
2 लाख 02 हजार 105 नमुन्यांपैकी 1 लाख 83 हजार 880 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत. तर 17 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात 2 लाख 12 हजार 742 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. काल राज्यात 43 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 694 झाली आहे.
Post a Comment