रेडझोन मधून आलेला घोडा क्वारंटाइन


MK Digital Line
जगभर पसरलेल्या कोरोनामुळे सर्वत्र भीती, दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकजण सावधगिरी बाळगत आहे. छोटीशी चूक कोरोनाग्रास्तांचा आकडा वाढवू शकते हे लक्षात आल्याने आता सर्वतोपरी काळजी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

माणसेच काय पण प्राणी आले तरी संबंधित गावाचे प्रशासन त्याचीही दाखल घेऊ लागले असल्याचा अनुभव जम्मू काश्मीरमध्ये नुकताच आला.

● घोड्याची तपासणी :

काश्मीरच्या राजौरीमध्ये एकजण त्याचा घोडा घेऊन आला. तो मुघल रोड, काश्मीर घाटीतून आला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबविले तेव्हा तो रेड झोनमधून आल्याचे उघड झाले. तत्काळ प्रशासनाला माहिती देऊन घोडे मालकाचे सँपल तपासणीसाठी घेतले, सोबतच पशुवैद्यकाला बोलावून घोड्याची तपासणी केली.

● पहिलीच घटना :

घोड्याला काही आजार नसल्याचे लक्षात आल्यानंतरही खबरदारी म्हणून घोड्याला 14 दिवस होम क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता घोडा मालकाच्या कुटुंबातील कुणीही घोड्याला 14 दिवस भेटू शकणार नाही. देशात कोरोना संकट आल्यापासून प्राण्याला 14 दिवस क्वारंटाइन करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post