25 मे पासून 'विमान' सेवा होणार सुरू
MK Digital Line
अखेर लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.
येत्या 25 मे पासून अंशकालीन पद्धतीने देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू केली जाणार आहे. 25 मे पासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहावे, अशी माहिती सर्व विमानतळाच्या प्रशासनाला आणि हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना दिली आहे.
प्रवाशांच्या प्रवासांसंदर्भात नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून जारी केली जाईल, असे हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. हवाई वाहतूक सुरू करताना कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान सरकारसमोर असणार आहे.
विशेष : महाराष्ट्र सरकारला मुंबईत विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईत येणाऱ्यांची संख्या इतर विमानतळांच्या तुलनेत अधिक असणार आहे.
Post a Comment