शाहरुख खानची 'बेताल' वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस
MK Digital Line
शाहरुख खानच्या रेड चिलीज या कंपनीने नेटफ्लिक्सवर आपली नवीन वेब सीरिज 'बेताल' घेऊन एन्ट्री केली आहे. शाहरुख खानने 2019 मध्ये बार्ड ऑफ ब्लडची निर्मिती केली होती, यामध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता.
मात्र यावेळी शाहरुख बेताल या वेबसिरीजच्या माध्यमातून एक हॉरर स्टोरी प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीजने अमेरिकन निर्माता जेसन ब्लमची कंपनी ब्लूमहाऊस प्रॉडक्शन यांच्याशी करार करून नेटफ्लिक्स ऑरिजनल वेब सीरीज बेताल तयार केली आहे.
हि वेब सीरिजची आज पासून नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे. या वेब सीरिजमध्ये विनीत कुमार मुख्य भूमिकेत आहे. या सिरीजमध्ये विनीत कुमारसोबत अहाना कुमरासुद्धा आहेत. अहानाने इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली असून त्याने वेब सीरिजच्या काही सीन्सचे फोटो शेअर केले आहेत.
Post a Comment